Homeताज्या बातम्याशिरपूरच्या कर्मवीर पोलीस प्रशिक्षण केंद्राची दमदार कामगिरी; दोन उमेदवारांची पोलीस शिपाई पदावर...

शिरपूरच्या कर्मवीर पोलीस प्रशिक्षण केंद्राची दमदार कामगिरी; दोन उमेदवारांची पोलीस शिपाई पदावर निवड

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे ) : कर्मवीर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, शिरपूर येथील प्रशिक्षणार्थींनी धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवत केंद्राचा लौकिक उंचावला आहे. अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध तयारीमुळे या केंद्राने यशाची नवी परंपरा निर्माण केली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थी कुमार अशोक हरसिंग पावरा यांनी 150 पैकी 128 गुण मिळवत अनुसूचित जमाती (ST) गटातून तिसरा क्रमांक पटकावला. तसेच कुमार गणेश मनोज मराठे यांनी 150 पैकी 132 गुण मिळवत धुळे जिल्ह्यात नववा क्रमांक मिळवला. या दोन्ही उमेदवारांच्या यशामुळे केंद्राच्या प्रशिक्षण पद्धतीची परिणामकारकता अधोरेखित झाली आहे.

या यशामागे प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक श्री. सागर कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध सराव पद्धती, कठोर शारीरिक प्रशिक्षण आणि लेखी परीक्षेची सखोल तयारी यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण घडवण्यात यश आले. प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्यात केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे, सचिव निशांतजी रंधे, खजिनदार आशाताई रंधे, संचालक राहुलजी रंधे, रोहितजी रंधे, शशांकजी रंधे, समन्वयक श्री. सागर, क्रीडा सल्लागार डॉ. लिंबाजी प्रताळे, क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कर्मवीर पोलीस प्रशिक्षण केंद्राने कमी कालावधीत सातत्यपूर्ण यश संपादन करत ग्रामीण भागातील युवकांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना पोलीस दलात संधी मिळवून देण्यासाठी केंद्र कटिबद्ध असून, यशाची ही परंपरा अधिक भक्कम करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!