Homeमहाराष्ट्रजिद्दीच्या बळावर कावेरी तूपटची पोलीस दलात भरारी; ब्रह्मपुरीत सत्कार सोहळा

जिद्दीच्या बळावर कावेरी तूपटची पोलीस दलात भरारी; ब्रह्मपुरीत सत्कार सोहळा

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कुमारी कावेरी प्रमोद तूपट हिने यशाची नवी उंची गाठली आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात तिची निवड झाल्याबद्दल ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनतर्फे तिचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

ब्रह्मपुरीतील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या कावेरीच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईने घरकाम करून कुटुंबाचा सांभाळ केला आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. आईच्या अथक परिश्रमांमुळे आणि कावेरीच्या चिकाटीमुळे हे यश शक्य झाले आहे.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, उपनिरीक्षक बालाजी चव्हाण व हवालदार अरुण पिसे यांच्या हस्ते कावेरीचा सत्कार करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील पोलीस पाटील यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक बानबले यांनी सांगितले की, अशा सत्कार सोहळ्यांमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळते. समाजातील तरुणांनी देशसेवेच्या भावनेने पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले.

कावेरीनेही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “आईच्या कष्टाचे आज फळ मिळाले. खाकी वर्दी घालून देशसेवा करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.”

कावेरीचे हे यश ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!