Homeमहाराष्ट्रखत दरवाढीचा फटका; खरीप हंगामाआधी शेतकरी अडचणीत

खत दरवाढीचा फटका; खरीप हंगामाआधी शेतकरी अडचणीत

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला असून रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. १ एप्रिलपासून खतांच्या दरात प्रति बॅग १२५ ते ३०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खतांची तयारी सुरू असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकरी उत्पादन खर्चात सुमारे ६ ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, डीएपीटीएसपी या खतांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी इतर खतांच्या दरवाढीमुळे एकूण खर्चाचा ताण कायम आहे. बाजारात जुन्या दराचा साठा असतानाही काही ठिकाणी वाढीव दराने विक्री होण्याची शक्यता असून, खत टंचाई व काळाबाजाराची भीतीही व्यक्त होत आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे व दरांची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साठा व विक्रीवर प्रशासनाने कडक नजर ठेवावी, अशी मागणी होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रमुख खतांची दरवाढ (प्रति बॅग):

  • एनपीके : ₹300
  • 10:26:26 : ₹225
  • 12:32:16 : ₹225
  • 14:35:14 : ₹225
  • 19:19:19 : ₹225
  • एमओपी : ₹125
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!