Homeमहाराष्ट्रपिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न; २२० लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न; २२० लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत मौजा पिंपळगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे व प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर ही शिबिरे आयोजित केली जात आहेत. पिंपळगाव येथील शिबिरात सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, जाती व उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्डमधील त्रुटी तसेच जमिनीचे प्रलंबित वाद यांसारख्या विविध प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तक्रारींचा तातडीने निपटारा करून प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जात आहे.

प्रांत अधिकारी पर्वणी पाटील यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ग्रामीण भागातील महिला व विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जात आहे.

या शिबिरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फेरफार व विविध दाखल्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान २२० लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार लीना बोभाटे, महानंदा मडावी, तालुका कृषी अधिकारी स्वाती घुले, उपअधीक्षक भूमी अभिलेख गोरखा, दुय्यम निबंधक संजय मडावी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि सुमारे ५०० ते ६०० नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!