Homeउद्योगपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निविदेत गंभीर अनियमिततेचे आरोप; कोट्यवधींच्या नुकसानाची भीती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निविदेत गंभीर अनियमिततेचे आरोप; कोट्यवधींच्या नुकसानाची भीती

Times Of Maharashtra Desk : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांच्या निविदा प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप समोर आला असून, यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित निविदांमध्ये उपसभापतींच्या स्वाक्षरीचा ‘स्थळ पाहणी अहवाल’ (Site Inspection Report) प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

ही अट कोणत्याही शासकीय नियमांमध्ये नमूद नसतानाही ती मनमानी पद्धतीने लागू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता व स्पर्धात्मकता धोक्यात आल्याची भावना कंत्राटदारांमध्ये व्यक्त होत आहे. अनेक पात्र कंत्राटदार या अटीमुळे प्रक्रियेपासून दूर राहत असून, स्पर्धा मर्यादित होत असल्याचे दिसून येत आहे.

स्पर्धा कमी झाल्यामुळे कामांच्या निविदांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, बाजार समितीला अपेक्षित उत्पन्न मिळण्यात घट होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचेही आरोप पुढे येत आहेत.

या प्रकरणी प्रशासनिक व तांत्रिक स्तरावर प्रश्न उपस्थित होत असून, उपसभापतींच्या स्वाक्षरीची अट लावणे हे नियमबाह्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या संदर्भात पुणे येथील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित अट तात्काळ रद्द करून निविदा प्रक्रिया पारदर्शक व स्पर्धात्मक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!