Homeक्राईमचार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष घटनेला चार दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याने गोरेगाव–लोणेरे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

१९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका निष्पाप मुलीची अशा पाशवी पद्धतीने हत्या होणे आणि त्यानंतरही आरोपींची अटक न होणे, ही पोलिस यंत्रणेची गंभीर अपयश असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “कायद्याचा धाक उरला आहे का?” असा थेट सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय संघटना एकत्र आल्या असून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. नरेश अहिरे, विकास गायकवाड, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, नंदकुमार शिर्के, बापू सोनगीरे, मुख्तार वेळासकर, दिनेश हरवंडकर, स्वाती करकरे, स्वीटी गिरासे, नाना महाले, प्रदीप गोरेगावकर, मधुकर नाडकर, अशोक यादव, रोहन साळवी आदींनी एकमुखाने इशारा दिला आहे की, “आरोपींना तत्काळ अटक झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.”

दरम्यान, पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई दिसून आलेली नाही. घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक तपास, मोबाईल लोकेशन तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी “परिणाम कुठे आहेत?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. “लवकरच आरोपी पकडले जातील,” या नेहमीच्या आश्वासनांवर आता लोकांचा विश्वास उरलेला नाही.

परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून गोरेगाव व लोणेरे हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या मनातील संताप तीव्र असल्याने परिस्थिती कधीही चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या “आमच्या मुलीला न्याय द्या” या आक्रोशाने संपूर्ण समाज हेलावून गेला आहे.

दरम्यान, २५ एप्रिल रोजी गोरेगाव–लोणेरे बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी १० वाजता ‘जन-अक्रोश मोर्चा’ काढण्याचे नियोजन होते, मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर तो तात्पुरता पुढे ढकलण्यात आला. तरीही ३० एप्रिलपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास २ मे रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आणि पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!