Homeताज्या बातम्यादेऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते डॉ. गणेश मांटे होते.

सभेला नगरपरिषद उपाध्यक्षपती राजेश भुतडा, बांधकाम सभापती विष्णू झोरे, बालकल्याण सभापती पती विकास कासारे, गटनेते छोटूभाऊ वाघ यांच्यासह भगवान बाबा नगर, समता कॉलनी व स्वामी विवेकानंद नगर परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सभेत पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, नवीन नळकनेक्शन, विद्युत पोल उभारणी, नाल्यांचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्त्यांच्या दर्जेदार कामांबाबत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. विशेषतः पाणीपुरवठा किमान आठ दिवसांत नियमित करण्याची मागणी नागरिकांनी केली.

यावर संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत, भगवान बाबा नगर परिसराचे सुशोभीकरण तसेच नालंदा वाचनालय परिसराच्या विकासालाही प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.

नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक थेट नागरिकांच्या दारी जाऊन समस्या जाणून घेत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सर्व समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव नागरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धुमाळ सर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!