Homeमहाराष्ट्रकांद्याची ट्रॉली अंगावर पडून नववीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

कांद्याची ट्रॉली अंगावर पडून नववीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

गेवराई (प्रतिनिधी  विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे अत्यंत दुर्दैवी अपघातात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात कांदे भरत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली अंगावर पडल्याने विश्वजीत शरद पराड (वय अंदाजे १५ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने विश्वजीत शेतात गेला होता. मिरगाव परिसरातील एका शेतात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये कांदे भरण्याचे काम सुरू होते. प्रखर उन्हामुळे विश्वजीत ट्रॉलीखाली सावलीत बसला होता.

दरम्यान, ट्रॉलीच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कांदे भरल्याने वजनाचा समतोल बिघडला. त्यामुळे ट्रॉलीचा पुढील भाग अचानक वर उचलला गेला आणि ट्रॉली पलटी होऊन थेट विश्वजीतच्या अंगावर पडली.

या भीषण अपघातात विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे मिरगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

error: Content is protected !!