Homeआरोग्यगेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

गेवराई तालुक्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनाभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, ५ एप्रिल २०२६ रोजी चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उमापूर येथून आरोपी विजय महादेव कव्हळे (रा. पळशी, जि. नांदेड) याने दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणींना अज्ञात कारणास्तव पळवून नेले होते. या गंभीर घटनेप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२६ कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलींच्या अपहरणामुळे हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. तपासाच्या सुरुवातीला आरोपीचे जुने वास्तव्य असलेल्या भिवंडी (जि. ठाणे) येथे पोलिसांनी शोध घेतला, मात्र तिथे आरोपी किंवा मुली मिळून आल्या नाहीत.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तांत्रिक बाबींची मदत घेतली, ज्यातून या मुली बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमाभागात असल्याचे धागेदोरे हाती लागले. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार एक विशेष तपास पथक तात्काळ उत्तर प्रदेशला रवाना झाले. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील शिवपुर दियार आणि त्यानंतर सिकंदरपूर या भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तिथे पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी विजय कव्हळे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर दोन्ही अल्पवयीन मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे आरोपी या मुलींना घेऊन छत्तीसगड राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच चकलांबा पोलिसांनी त्याला जेरबंद करून मोठा अनर्थ टाळला. सलग चार दिवसांचा प्रवास करून तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. ही महत्त्वाची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस कर्मचारी कल्याण पवार, हनुमान इंगोले तसेच तांत्रिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि विकी सुरवसे यांनी बजावली आहे. बीड पोलिसांच्या या तत्परतेमुळे दोन निष्पाप मुलींची सुटका झाल्याने सर्वत्र चकलांबा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!