Homeक्राईमलुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 3 वर्षांत 9 नवरदेवांना गंडा

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  लग्नाच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ चा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील

उमापूर येथील घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने गेल्या तीन वर्षांत तब्बल नऊ विवाह करून प्रत्येक वेळेस नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांची लाखोंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. उमापूर येथील एका तरुणाच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. संबंधित तरुणीने त्या तरुणाशी विवाह केला. मात्र हे तिचे पहिले किंवा दुसरे नव्हे, तर नववे लग्न असल्याचे

चौकशीत निष्पन्न झाले. 2023 पासून ती अशा प्रकारे विविध ठिकाणी विवाह करून फसवणूक करत असल्याचे पीडिताने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लक्ष्य करून ही टोळी काम करत होती. टोळीतील एजंट मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधून लग्नासाठी मुलगी उपलब्ध असल्याचे सांगत. त्यानंतर मुलीकडील खर्च, मध्यस्थी

किंवा इतर कारणे सांगून मुलाकडून लाखो रुपये उकळले जात. लग्न झाल्यानंतर काही दिवस नवरी सासरी राहून विश्वास संपादन करायची आणि संधी मिळताच घरातील रोख रक्कम व दागिने घेऊन पसार व्हायची. उमापूर येथील पीडित तरुणाकडूनही अशाच पद्धतीने सुमारे तीन लाख रुपयांची उकळपट्टी करण्यात आली. सुरुवातीला साडेतीन लाखांची मागणी करण्यात आली होती; मात्र ती तीन लाखांत ठरली. एक लाख रुपये रोख तर दोन लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे देण्यात आले. उमापूर येथील मंदिरात विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच

नवरीने घरातील रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोने घेऊन पलायन केले. नवरीकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने पीडिताला संशय आला. त्याने चौकशी केल्यानंतर या

तरुणीने यापूर्वीही आठ जणांसोबत विवाह करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणांमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या आंदुरे दाम्पत्याची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्यायाची मागणी केली आहे. या टोळीत गणेश आंदुरे व राधा आंदुरे यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, लग्नाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

उमापूर येथील तरुणाच्या फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्यांची चौकशी सुरु आहे दोषी आढळल्यास तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करु

सचिन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चकलांबा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

error: Content is protected !!