Homeटेक्नॉलॉजीशिरपूर तालुक्यासाठी जनगणनेची पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण

शिरपूर तालुक्यासाठी जनगणनेची पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  ‘जनकल्याणासाठी जनगणना’ हे ब्रीद घेऊन यंदा 16 वी जनगणना डिजिटल पद्धतीने घर यादी व लोकसंख्या गणना अशा दोन टप्प्यात होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनाअंतर्गत स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या पोर्टलवर लॉगिन करून माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होईल, जो संबंधित प्रगणकास सादर करणे अनिवार्य आहे.
*यानंतर 16 मे ते 14 जून या काळात नियुक्त प्रगनक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत.*

घर यादी व घर गणना या पहिल्या टप्प्यासाठी शिरपूर तालुक्यामध्ये 575 घर यादी गटांकरिता 574 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी 96 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दहा टक्के राखीव कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे.

नियुक्त केलेले सर्व प्रगणक त्यांच्या मोबाईल मधील HLO (House Listing Operation) या ॲपच्या मदतीने 33 प्रश्नांची माहिती नागरिकांकडून संकलित करून ती ॲपमध्ये नोंदवतील. नागरिकांनी दिलेली माहिती जनगणनेच्या कायद्यानुसार पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. या मोहिमेसाठी 10 फिल्ड ट्रेनर्स मार्फत प्रगनकांना 27 एप्रिल ते 7 मे या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, घरी येणाऱ्या प्रगणकांना विहित केलेल्या 33 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन जनगणनेच्या कामासाठी सहकार्य करावे. महेंद्र माळी
तहसीलदार शिरपूर तथा चार्ज अधिकारी जनगणना

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!