शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आज येथील आमदार कार्यालयात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या 486व्या जयंती निमित्त श्री अमरीशभाई पटेल, मा नगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल, शहराध्यक्ष श्री चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील भाजपा कार्यालयात आमदार श्री काशिरामदादा पावरा यांच्या शुभहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज देशभरात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. 09 मे 1540 रोजी राजस्थान येथील पाली मारवाड येथे जन्मलेले राणा प्रताप मेवाडचे सिसोदिया घराण्यातील एक पराक्रमी राजपूत राजे होते. मुघल सम्राट अकबराविरुद्ध संघर्ष करत, त्यांनी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत लढा दिला.
हल्दीघाटीच्या प्रसिद्ध लढाईसाठी ते इतिहासात अमर आहेत. ते केवळ एक राजे नव्हते, तर धैर्य, त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनाही महाराणा प्रताप यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीपासून प्रेरणा मिळाली होती.
यावेळी नंदुरबार जिल्हा भाजप प्रभारी बबनभाऊ चौधरी, शिरपूर विधानसभा प्रमुख के डी पाटील, ग्रामीण विखरण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, ग्रामीण सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, ग्रामीण थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपालसिंग राजपूत, कृउबा मा सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पं स मा उपसभापती जगतसिंग राजपूत, नगरसेवक राज सिसोदिया,
हर्षल गिरासे, भाजपा ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील चिटणीस राजेंद्र चौधरी, मा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, संजय आसापुरे ओबीसी मोर्चा, महेंद्र पाटील, राधेश्याम भोई, रामेश्वर शिवदे, रविंद्र भोई, नरेश पवार, नंदू माळी, राजू शेख, मंजित पावरा, गजेंद्रसिंग राजपूत. योगीराज बोरसे, संजय साळुंखे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















