शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : ‘जनकल्याणासाठी जनगणना’ हे ब्रीद घेऊन यंदा 16 वी जनगणना डिजिटल पद्धतीने घर यादी व लोकसंख्या गणना अशा दोन टप्प्यात होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनाअंतर्गत स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या पोर्टलवर लॉगिन करून माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होईल, जो संबंधित प्रगणकास सादर करणे अनिवार्य आहे.
*यानंतर 16 मे ते 14 जून या काळात नियुक्त प्रगनक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत.*
घर यादी व घर गणना या पहिल्या टप्प्यासाठी शिरपूर तालुक्यामध्ये 575 घर यादी गटांकरिता 574 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी 96 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दहा टक्के राखीव कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे.

नियुक्त केलेले सर्व प्रगणक त्यांच्या मोबाईल मधील HLO (House Listing Operation) या ॲपच्या मदतीने 33 प्रश्नांची माहिती नागरिकांकडून संकलित करून ती ॲपमध्ये नोंदवतील. नागरिकांनी दिलेली माहिती जनगणनेच्या कायद्यानुसार पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. या मोहिमेसाठी 10 फिल्ड ट्रेनर्स मार्फत प्रगनकांना 27 एप्रिल ते 7 मे या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, घरी येणाऱ्या प्रगणकांना विहित केलेल्या 33 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन जनगणनेच्या कामासाठी सहकार्य करावे. महेंद्र माळी
तहसीलदार शिरपूर तथा चार्ज अधिकारी जनगणना






















