Homeताज्या बातम्याजळगावात महसूल विभागातील लाचखोरी उघड; मंडळ अधिकारीसह खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

जळगावात महसूल विभागातील लाचखोरी उघड; मंडळ अधिकारीसह खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

जळगाव(प्रतिनिधी : विनोद पवार) :  लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने जळगाव येथे महसूल विभागातील लाचखोरी प्रकरणात मंडळ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरोधात शेतातील कथित अवैध खोदकामाबाबत स्थानिक नागरिकांनी महसूल विभागासह विविध कार्यालयांकडे तक्रारी दिल्या होत्या. या प्रकरणातील चौकशी अनुकूलरीत्या निकाली काढण्यासाठी मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर ही रक्कम पन्नास हजार रुपयांवर ठरल्याचे समोर आले.

तक्रारदाराने याबाबत नाशिक येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तपासादरम्यान मंडळ अधिकारी देवरे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम खासगी व्यक्ती सुरेंद्र प्रल्हाद अहिरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयाबाहेर उभारण्यात आलेल्या सापळ्यात सुरेंद्र अहिरे हा पन्नास हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत एसीबीचे सापळा अधिकारी राहुलकुमार नाईक, हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!