Homeआरोग्यगर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जन्नी पुसू नैताम या गर्भवती महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी तब्बल १४ तास प्रतीक्षा करावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता जन्नी नैताम यांना प्रसूतीकळा सुरू झाल्याने भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अहेरीला पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर मृतदेह अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथेही हे प्रकरण महिला व बाल रुग्णालयाशी संबंधित असल्याचे कारण देत शवविच्छेदनास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. परिणामी मृतदेह अनेक तास शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत राहिला.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार जावेद अली व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला. त्यानंतर विशेष डॉक्टरांची टीम अहेरीकडे रवाना करण्यात आली. अखेर दुपारी सुमारे २ वाजता शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या दुर्गम भागांतील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक उपकरणे, आपत्कालीन सेवा आणि रुग्णालयांमधील समन्वय सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे मागणी

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सण तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता...

error: Content is protected !!