Homeताज्या बातम्यामनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार श्री. समीर मोरे यांना देण्यात आलेल्या पालघर व डहाणू विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदाला स्थगिती देण्यात आली आहे. पक्षशिस्तीचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही काळापासून पालघर मनसेतील अंतर्गत घडामोडी आणि वाद चर्चेत होते. समीर मोरे यांच्याशी संबंधित राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील मनसेच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाल्याची चर्चा होती.

यापूर्वी समीर मोरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्तही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता मनसे नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपद स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

पक्षशिस्तीचे पालन न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून पक्ष नेतृत्वाने दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संबंधित आदेशाची नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पालघर मनसेतील अंतर्गत घडामोडींनंतर पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचा आगामी काळात जिल्ह्यातील मनसेच्या संघटनात्मक आणि राजकीय वाटचालीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे मागणी

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सण तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता...

error: Content is protected !!