Homeताज्या बातम्याडिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळीतील फरार आरोपीला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. रोहन रामेश्वर जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिकाला सायबर गुन्हेगारांनी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधला. त्यांच्या नावावर गुन्हा दाखल झाल्याचे सांगत ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर बँक खात्यांची पडताळणी, मनी लाँडरिंग प्रकरणातील चौकशी आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा जमा करण्यास भाग पाडण्यात आले.

या प्रकारात पीडित नागरिकाकडून एकूण ₹१० कोटी ७४ लाख ६५ हजार इतकी रक्कम ऑनलाइन पद्धतीने वळवून घेण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपी रोहन जाधव हा या टोळीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपी सोशल मीडियावर ‘Rohan Jadhav’ या नावाने Instagram खाते वापरत असल्याची माहितीही तपासात समोर आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. अखेर सायबर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात फसवणुकीची रक्कम गोठविण्याची कारवाई केली असून, टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणामागे मोठे सायबर नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय असून, आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून आरोपींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे.

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी अथवा इतर सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैसे जमा करण्यास सांगत नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास घाबरून पैसे न देता तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे मागणी

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सण तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता...

सिन्नरमध्ये तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ शाळांचा सहभाग

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :सिन्नर येथे सह्याद्री युवा मंच आणि सिन्नर तालुका शालेय क्रीडा आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले....

जपतलाई आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0
दौड:(प्रतिनिधी मयुर साळवे,संघराज गायकवाड)  गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत तीन...

‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४ ऑगस्टपर्यंत मुदत

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमांतर्गत...

गेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड रुजू; वाळू तस्करी आणि एजंटशाहीविरोधात कडक कारवाईचा इशारा

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  गेवराईच्या नव्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. राक्षसभुवन येथील चर्चेत असलेल्या वाळू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी...

error: Content is protected !!