Homeताज्या बातम्यानागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे...

नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे मागणी

ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सण तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता भासते. मात्र, नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिक पातळीवर योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी नगर परिषद कार्यालयात नागरिकांसाठी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक मनोज भूपाल यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.

राष्ट्रध्वज उपलब्ध करून देताना राष्ट्रध्वज संहिता आणि शासनाच्या संबंधित नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणी भूपाल यांनी केली आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी किंवा मिळवण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागू नये, यासाठी नगर परिषद कार्यालयातच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच राष्ट्रध्वजाचा सन्मान, योग्य वापर आणि त्यासंदर्भातील नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असेही भूपाल यांनी म्हटले आहे. राष्ट्रध्वजाची विक्री किंवा वितरण करताना शासनाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रध्वज नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याबाबत नगर परिषद प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत नगर परिषद ब्रम्हपुरीच्या मुख्य अधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी सांगितले की, “नागरिकांना राष्ट्रध्वज मोफत द्यायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे ब्रम्हपुरी नगर परिषद प्रशासनाचा आहे. या मागणीचा योग्य विचार करून शासकीय नियमांनुसार यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.”

नगरसेवक मनोज भूपाल यांच्या मागणीमुळे नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध होण्यासोबतच त्याच्या सन्मानपूर्वक वापराबाबत जनजागृतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

सिन्नरमध्ये तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ शाळांचा सहभाग

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :सिन्नर येथे सह्याद्री युवा मंच आणि सिन्नर तालुका शालेय क्रीडा आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले....

जपतलाई आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0
दौड:(प्रतिनिधी मयुर साळवे,संघराज गायकवाड)  गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत तीन...

‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४ ऑगस्टपर्यंत मुदत

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमांतर्गत...

गेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड रुजू; वाळू तस्करी आणि एजंटशाहीविरोधात कडक कारवाईचा इशारा

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  गेवराईच्या नव्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. राक्षसभुवन येथील चर्चेत असलेल्या वाळू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी...

error: Content is protected !!