Homeताज्या बातम्यागेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड रुजू; वाळू तस्करी आणि एजंटशाहीविरोधात कडक कारवाईचा इशारा

गेवराईच्या तहसीलदारपदी गीतांजली गरड रुजू; वाळू तस्करी आणि एजंटशाहीविरोधात कडक कारवाईचा इशारा

गेवराई:(प्रतिनिधी विष्णू गायकवाड)  गेवराईच्या नव्या तहसीलदार म्हणून गीतांजली गरड यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला. राक्षसभुवन येथील चर्चेत असलेल्या वाळू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी स्वीकारताच गरड यांनी तालुक्यातील अवैध वाळू उपसा, तस्करी आणि तहसील कार्यालयातील एजंटशाहीला आळा घालण्याचे संकेत दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथून बदली होऊन आलेल्या गीतांजली गरड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि महसूल विभागातील कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि कामाचा वेग वाढवणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एसआयआर’चे राष्ट्रीय कर्तव्य वेळेत पूर्ण करण्यासोबतच महसूल दप्तरी प्रलंबित असलेली सामान्य नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना अनावश्यक विलंब किंवा मध्यस्थांच्या माध्यमातून कामे करून घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.

गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे संकेत तहसीलदार गरड यांनी दिले.

ज्या भागात अवैध वाळू उपसा आढळून येईल, त्या ठिकाणच्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नव्या तहसीलदारांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे महसूल प्रशासनात शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील कारवाईकडे गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध करून द्यावा; नगरसेवक मनोज भूपाल यांची ब्रम्हपुरी पालिकेकडे मागणी

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख) राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय सण तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नागरिकांना राष्ट्रध्वजाची आवश्यकता...

सिन्नरमध्ये तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ शाळांचा सहभाग

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :सिन्नर येथे सह्याद्री युवा मंच आणि सिन्नर तालुका शालेय क्रीडा आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले....

जपतलाई आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तिघींचा मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

0
दौड:(प्रतिनिधी मयुर साळवे,संघराज गायकवाड)  गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत तीन...

‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; १४ ऑगस्टपर्यंत मुदत

0
ब्रम्हपुरी :(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमांतर्गत...

error: Content is protected !!