या पॅनेलमध्ये अजित पवार स्वत: उमेदवार असून, संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना करत आहेत. अॅड. केशवराव जगताप म्हणाले, “ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहोत. कोणतीही नाराजी न ठेवता जोमाने प्रचारात सहभागी व्हा. अजितदादांनी निवडलेल्या उमेदवारांमध्येच माझे उमेदवार आहेत, हे समजून सर्वांनी निळकंठेश्वर पॅनेलला विजयी करायचे आहे.”
अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र जागा मर्यादित असल्याने केवळ २१ जणांनाच संधी देण्यात आली. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्या नाराजीचा गैरफायदा विरोधक घेतील, अशी शक्यता लक्षात घेता त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique ComComputers
👆👆Click the Image 👆👆
अॅड. जगताप पुढे म्हणाले, “अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाईल. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने पॅनेल विजयी करण्यासाठी काम करावे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी सांगितले की, “माळेगाव कारखाना राज्यातील इतर आघाडीच्या कारखान्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. ऊस दर, साखर उत्पादन, इथेनॉल व वीज निर्मितीतून अधिक महसूल मिळवण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने काम करत आहे. आता एआय (कृत्रीम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.”
पाच वर्षात सभासदांना विक्रमी ऊस दर देण्यात आला असून, ऊस गाळप वेळेत पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा यांसारखी हंगामी पिके घेता आली. कामगारांचे प्रश्न सोडवले गेले आणि वित्तीय संस्थांची देणीही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावेळी निळकंठेश्वर पॅनेलला सभासदांचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.























