Homeताज्या बातम्याचांदणी चौकात भीषण अपघात: इर्टिगा चालकाच्या बेशिस्तपणामुळं ट्रेलर चालकासह दोघांचा मृत्यू

चांदणी चौकात भीषण अपघात: इर्टिगा चालकाच्या बेशिस्तपणामुळं ट्रेलर चालकासह दोघांचा मृत्यू

पुणे – शहरातील चांदणी चौकात गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र खळबळ उडवली आहे. या अपघातात लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या चालकासह त्याच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या अपघातास इर्टिगा कार चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडवून इर्टिगा चालक घटनास्थळावरून पसार झाला.

हा अपघात रात्री आठच्या सुमारास घडला. राजस्थानमधून निघालेला आणि मुंबईमार्गे बंगळुरूकडे जाणारा ट्रेलर चांदणी चौकाजवळील रस्त्याच्या कामाजवळ पोहोचला असताना समोरून एक इर्टिगा कार अचानक आडवी आली. ट्रेलर चालकाने कारला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. परिणामी, ट्रेलरमध्ये लोड करण्यात आलेल्या लोखंडी सळ्या आणि पाईप्स पुढे सरकत चालकाच्या केबिनमध्ये घुसल्या. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याचाही मृत्यू झाला.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

अपघातानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अपघातानंतर काही काळ त्याची हालचाल दिसून आली, मात्र अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. मृत चालक हा ट्रेलरचा मालक असल्याचेही उघड झाले आहे.

या घटनेमुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. मुंबई आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा सूसपर्यंत आणि पुढे वारजेपर्यंत लागल्या होत्या, अशी माहिती स्थानिक तरुण शुभम भुंडे यांनी दिली.

सध्या हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. इर्टिगा कारचा चालक अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!