Homeताज्या बातम्यामाळेगाव साखर कारखाना निवडणूक : नाराजांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न; केशवराव जगताप, बाळासाहेब...

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : नाराजांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न; केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे यांच्यावर जबाबदारी…

पुणे/माळेगाव:माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकृत ‘निळकंठेश्वर पॅनेल’ जाहीर केला असून, या पॅनेलमधून २१ जागांसाठी २१ उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांची नाराजी दिसून येत आहे. ही नाराजी शांत करण्यासाठी अॅड. केशवराव जगताप व माजी आमदार बाळासाहेब तावरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

या पॅनेलमध्ये अजित पवार स्वत: उमेदवार असून, संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांना करत आहेत. अॅड. केशवराव जगताप म्हणाले, “ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहोत. कोणतीही नाराजी न ठेवता जोमाने प्रचारात सहभागी व्हा. अजितदादांनी निवडलेल्या उमेदवारांमध्येच माझे उमेदवार आहेत, हे समजून सर्वांनी निळकंठेश्वर पॅनेलला विजयी करायचे आहे.”

अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र जागा मर्यादित असल्याने केवळ २१ जणांनाच संधी देण्यात आली. यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, त्या नाराजीचा गैरफायदा विरोधक घेतील, अशी शक्यता लक्षात घेता त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique ComComputers

👆👆Click the Image 👆👆

अॅड. जगताप पुढे म्हणाले, “अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाईल. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने पॅनेल विजयी करण्यासाठी काम करावे.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी सांगितले की, “माळेगाव कारखाना राज्यातील इतर आघाडीच्या कारखान्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. ऊस दर, साखर उत्पादन, इथेनॉल व वीज निर्मितीतून अधिक महसूल मिळवण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने काम करत आहे. आता एआय (कृत्रीम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.”

पाच वर्षात सभासदांना विक्रमी ऊस दर देण्यात आला असून, ऊस गाळप वेळेत पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा यांसारखी हंगामी पिके घेता आली. कामगारांचे प्रश्न सोडवले गेले आणि वित्तीय संस्थांची देणीही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावेळी निळकंठेश्वर पॅनेलला सभासदांचा भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

error: Content is protected !!