Homeताज्या बातम्याविद्यार्थी हितासाठी अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन कार्यरत राहणार : अॅड. अनुजा...

विद्यार्थी हितासाठी अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन कार्यरत राहणार : अॅड. अनुजा पाटील

अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशन, पुणे सामाजिक संस्थेची धायरीतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत

पुणे : “सामाजिक जाणिवेतून सुरू झालेली ही अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन विद्यार्थी हितासाठी काम करत आहे. शेतकरी वर्गातून पुढे आलेले हे कुटुंब आज एका उदात्त भावनेतून काम करीत आहे. शिक्षणासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. यापुढेही असेच काम सातत्याने सुरू राहील,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व ॲड. अनुजा पाटील यांनी येथे व्यक्त केले.

पुण्यातील धायरीमध्ये नारायणराव सणस विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मधील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. ज्ञानाच्या वाटेवर नवचैतन्याचा प्रकाश पेरणाऱ्या अशा अत्यंत अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्याना त्यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप सुपूर्त करण्यात आले. ही रक्कम मुलांना संस्थेकडून त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, “ही केवळ शिष्यवृत्तीच नव्हे तर ती गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आशेचा किरण आहे. या संकल्पनेचा पाया माणुसकीच्या मूल्यावर, शिक्षणप्रेमावर आणि समाजभानाच्या जाणिवेवर. रचण्यात आला आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि गरजूंच्या कल्याणासाठी अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करते.”

डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर म्हणाले, “मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा याचा उद्देश आहे. अनुजा सुशांत पाटील फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत केली जात त्यांनी नमूद केले. यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत देणार असल्याचेही ते म्हणाले. मुलांनीही त्यांच्या आयुष्यात इतरांना मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले.  यावेळी फाऊंडेशनचे वित्त नियंत्रक रोहन पवार, संचालक गणेश चव्हाण, प्रकल्प संचालक श्रीराम चव्हाण, प्रकल्प अधिकारी मदन आडे, प्राचार्य रोडे सर, उपप्राचार्या रोहिणी पवार डॉ. सुभाष राठोड आणि विद्यालयाचा शिक्षकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. संस्थेच्या वतीने शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे पालक आणि विद्यार्थी वर्ग समाधानी असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे मनपाचा अजब कारभार! शासनाने मुलाखती केल्या रद्द, तरीही महापालिकेत ‘अर्थपूर्ण’ मुलाखतींचा घाट; उपायुक्त...

0
पुणे: राज्य सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी गट 'ब' आणि गट 'क' पदांच्या भरतीसाठी मुलाखती रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे....

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

error: Content is protected !!