ही बढती त्यांना त्यांच्या पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि पक्षवाढीसाठी दिलेल्या योगदानामुळे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काशीफ सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय पदाधिकारी रोहन गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेत पक्षाने सय्यद यांना पुणे शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
सय्यद यांचे पूर्वीचे सरचिटणीसपद आता रोहन गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यामध्ये पक्षाच्या युवा नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच, अनुभवी कार्यकर्त्यांचे योगदानही सन्मानाने स्वीकारले जात असल्याचे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून समजते.
Advertisement by Unique Computers
काशीफ सय्यद यांची ही नियुक्ती पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.























