Homeताज्या बातम्याLeopard Conflict: अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी...

Leopard Conflict: अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची उपाययोजना 

Times of Maharashtra desk, Ahilyanagar: मागील काही महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांकडून मानवी वस्तीवरील हल्ल्यामध्ये मोठी वाढ झाली असून लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. ग्रामीण भागासह काही शहरी भागातील नागरिक देखील या वाढत्या बिबट हल्ल्यांमुळे भयभीत झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असल्याने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीची उपाययोजना म्हणून बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.

नगर जिल्ह्यात प्राथमिक शाळा एक किमी आणि उच्च प्राथमिक शाळा तीन किमी अंतरावर उपलब्ध असल्या तरी बहुतांश विद्यार्थी पायीच शाळेत ये-जा करतात. दरम्यानच्या मार्गावर ऊस शेती, जंगल पट्टे, डोंगराळ भाग आणि बिबट प्रवण क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोका निर्माण झाला आहे. सध्या ऊसतोडीमुळे जिल्ह्यातील ऊस क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांची हालचाल अधिक खुली झाली असून हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यातच हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थी घरी परतताना धोका आणखी वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० या वेळेत शिक्षण व दैनंदिन कामकाज सुरू ठेवावे असे आदेश दिले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळा समितीची मंजुरी घेतल्यानंतर हा बदल लागू करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच, तात्काळ जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठात विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत उद्बोधन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. शाळा सुटताना पालकांनी आपल्या पाल्यांना स्वतःसोबत घेऊन जाण्यास प्राधान्य द्यावे, यासाठी पालक मेळावे घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थी सुरक्षितरीत्या घरी पोहोचल्याची खात्री वर्गशिक्षकांनी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय, शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समित्यांच्या सभा दरमहा घेऊन अतिरिक्त सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्याची गरजही जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केली आहे. तालुक्यातील किती शाळांनी वेळेत बदल केला आहे, याचा अहवाल गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बिबट्यांच्या धोक्यापासून विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही पावले अत्यंत महत्त्वाची ठरत असून पुढील काही दिवसांत शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्या सक्रिय सहभागाची गरज अधिक वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!