Times of Maharashtra Desk, Maharashtra politics:सध्या महाराष्ट्रात राजकीय परिस्थित तापलेली दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातून रोज नवीन बातम्या समोर येत आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमध्ये काही दिवसांपासून नाराजी होती. आता त्या नाराजीचे कारण उघड झाले आहे.यावर उपाय म्हणून शिवसेना आणि भाजपमध्ये एक मोठा निर्णय झाला आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या पक्षातील कोणताही नेता किंवा कार्यकर्ता भाजपमध्ये जाणार नाही.भाजपने दावा केला आहे की शिवसेनेचा कोणताही कार्यकर्ता पक्षात सामील केला जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या मुद्द्यावर वरिष्ठ शिवसेना आणि भाजप नेते बैठक घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी कोणते आश्वासन दिले?
काही दिवसांपासूम महायुतीत मतभेद होताना पाहायला मिळत आहेत. सध्या महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आश्वासन दिले आहे की निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्ष युती धर्माचे पालन करतील. घेतल्या जाणाऱ्या बैठलीत दोन्ही पक्ष मिळून महायुती अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील संघर्ष आणि ते कसे सोडवायचे यावर चर्चा करणार आहेत.
ठाणे, डोंबिवली आणि कल्याण हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे.येथील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होण्याचा विचार करत होते.या असंतोषामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. आता यावर शिंदे पक्षातील कोणताही नेता किंवा कार्यकर्ता भाजप पक्षात सामील केला जाणार नाही असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की आतापासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, परंतु दोन्ही पक्षांना हा नियम पाळावा लागेल. या विषयावर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झाले आहे.आता ह्या युतीतील असंतोष संपला असून घेतल्या जाणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार? सिवसेना आणि भाजप कोणती रणनीती आखणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.






















