Homeमहाराष्ट्रसेवाग्राम आश्रमात जळगावच्या पत्रकाराचा गौरव : डॉ. विनोद सुधाकर पवार यांना 'अहिंसा...

सेवाग्राम आश्रमात जळगावच्या पत्रकाराचा गौरव : डॉ. विनोद सुधाकर पवार यांना ‘अहिंसा सन्मान 2026’

विनोद पवार  ( जळगांव प्रतिनिधी) :  सेवाग्राम आश्रम या ऐतिहासिक व पवित्र स्थळी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. विनोद सुधाकर पवार यांना नेपाळस्थित गांधी पीस फाऊंडेशन तर्फे ‘अहिंसा सन्मान 2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. महात्मा गांधी यांच्या कार्यभूमीवर २२ मार्च २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास नेपाळहून आलेले गांधी देशपांडे (राष्ट्रीय संपर्क प्रमुख) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच गांधी पीस फाऊंडेशनचे जनरल सेक्रेटरी ॲड. डॉ. दिल बहादुर राणा, डॉ. सुनील सिंग परदेशी (संस्थापक अध्यक्ष – कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन, नाशिक), डॉ. मनोहर चव्हाण (माजी सैनिक), डॉ. रेणुका दास जोशी आणि डॉ. दिनेश देशमुख यांच्या हस्ते डॉ. पवार यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

या सोहळ्यात महाराष्ट्रातील तब्बल २१ नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांना समाजसेवा, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, योग आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय राज्यातील तीन व्यक्तींना “ग्लोबल पीस अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून अनेक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण गांधीवादी विचारांनी प्रेरित आणि सेवाभावी कार्याच्या गौरवाने भारलेले होते.

 आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. पवार म्हणाले 

“हा पुरस्कार मी माझ्या मातृचरणी अर्पण करतो. माझ्या कुटुंबियांसह समाजातील विविध घटक आणि ज्यांनी समाजसेवा व पत्रकारितेच्या कार्यासाठी मला प्रोत्साहन दिले त्या सर्वांना हा सन्मान समर्पित आहे.”

डॉ. विनोद सुधाकर पवार यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!