Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड 'उपमहापौर' पदांबाबत उत्सुकता शिगेला पोहचली.

पिंपरी-चिंचवड ‘उपमहापौर’ पदांबाबत उत्सुकता शिगेला पोहचली.

Times Of Maharashtra Desk  : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या पिंपरी चिंचवड महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काही वेगळं घडेल का? अशी चर्चा रंगलेली आहे. कारण महापौर बिनविरोध करु इच्छिणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीनं उपमहापौर पदासाठी मात्र वैशाली काळभोरांचा अर्ज दाखल केला आहे. १२८ पैकी ३७ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या पारड्यात उपमहापौर पद पडणार नाही, हे उघड आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडून उपमहापौर पद हवंय का? दिवंगत अजित पवारांच्या  सहानुभूतीचा आधार घेऊन, असं काही घडवायचं आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

उपमहापौर पद आम्हास मिळावे- राष्ट्रवादीची सुप्त इच्छा!

खरं तर हे उघडपणे कोणी ही बोलायला तयार नाही. पण खाजगीत अशी इच्छा राष्ट्रवादीचे काही नेते बोलून दाखवतात आणि प्रत्यक्षात कृती ही तशीच करतात. भाजपच्या रवी लांडगे विरोधात महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा नाही अन शर्मिला बाबरांच्या विरोधात उपमहापौर पदासाठी निवडणूक लावून ते अप्रत्यक्षपणे तिचं मागणी करतायेत. स्थानिक भाजपला हे मान्य नसल्याचं दिसून येतं आहे. मात्र राज्य पातळीवरील नेत्यांनी याबाबत हालचाली कराव्यात, अशी स्थानिक राष्ट्रवादीची इच्छा असल्याचं दिसतंय. दिवंगत अजित दादांच्या सहानुभूतीचा आधार यासाठी घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रवी लांडगे नवा महापौर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा दुसऱ्या टर्म मधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना मिळाला आहे. रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. उपमहापौर पदी भाजपचे निष्ठावान शीतल उर्फ विजय शिंदे यांची निवड झाली होती. मात्र अचानक उपमहापौर पदाचे उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये ऐनवेळी ट्विस्ट आलाय. भाजपवर उपमहापौर पदाचे उमेदवार बदलण्याची वेळ आली. शीतल शिंदे पालिकेतून निघून गेल्यानं शर्मिला बाबरांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा अर्ज दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदासाठी अर्ज दाखल केला नसला तरी उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबरांच्या विरोधात वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केलाय.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या  १२८ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान झालं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ६५ जागांची गरज आहे. हा आकडा भाजपने पार केला आहे.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लढाईत भाजपने एकतर्फी बाजी मारली.

सद्यस्थिति –    भाजप – 84        राष्ट्रवादी – 37            शिवसेना – 06                  अपक्ष – 01
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!