Homeक्राईमकोंढव्यात दोन गटांत हिंसक संघर्ष; ससून रुग्णालयातही हल्ले, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

कोंढव्यात दोन गटांत हिंसक संघर्ष; ससून रुग्णालयातही हल्ले, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

Times Of Maharashtra Desk : कोंढवा (पुणे) परिसरात बडी रातच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाले. रस्त्यावर सुरू झालेल्या मारहाणीनंतर थेट ससून रुग्णालयातही हल्ले झाले. या घटनेत दोन्ही गटांतील चार जण गंभीर जखमी झाले असून, कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी ८ ते १० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी बडी रातनिमित्त कौसरबाग परिसरात मशिदीबाहेर वाद सुरू असताना असलम हनीफ खान यांनी ११२ वर फोन करून पोलिस मदत मागवली. याच कारणावरून दुसऱ्या दिवशी असलम खान यांच्यावर लोखंडी फायटर व धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला. जखमींना ससून रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथेही दोन्ही गट आमनेसामने आले आणि पुन्हा रक्तरंजित संघर्ष झाला.

या हल्ल्यात असलम खान, त्यांचे भाऊ सलीम खान व पुतण्या अब्दुल समद गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या गटातील शफाक अशफाक शेख व त्यांचे साथीदारही जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, कोंढवा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

संपूर्ण प्रकार पार्किंगच्या वादातून सुरू झाल्याचे समोर आले असून, पूर्ववैमनस्यातून हल्ले झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगताप व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!