Times of Maharashtra Desk Anjali Damania,Resignation Demand
: राज्यात सध्या स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या गडबडीत आहेत. अनेक पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आणि यातच पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या साठी त्यांनी मुंबई येथे जाऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पैकी कोणी वाचवू शकत नाही. असा इशारा दिला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या आजवरच्या घोटाळ्या बद्दल मी न्यायालयात जाऊन न्याय मागणार आहे असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील अंजली दामियाना यांनी केली आहे.
राजीनाम्याच्या मागणीवर पवारांची प्रतिक्रिया
पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतापमणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी राजीनामा मागणीवर बोलताना ते म्हणाले “पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला या प्रकरणाचा अभ्यास करू द्या . त्यांच्या निकालावरून जो काही निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ घेतील. तो पर्यंत मी या प्रकरणावर कोणते ही भाष्य करणार नाही. मला जे हवं ते मी करेन . माझ्या बुद्धीला जे पटेल त्यावरून मी निर्णय घेईन
पत्रकारांशी इतर समस्यावर संवाद
यावेळी पत्रकारांनी अल्पवयीन गुन्हेगारी विरोधात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले ” पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी विशेषतः अल्पवयीन मुले गुन्हेगारीत येत आहेत, १४ ते १५ वर्षांखालील मुले गुन्हे करत आहेत, अल्पवयीन मुलाचे वय १८ वर्ष आहे, ते काढून कमी करावे हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देत आहोत, काही चुकीचे लोक त्यांचा हेतू साधण्याकरिता अल्पवयीन मुलाला सामावून घेत आहेत, कारण ते अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल करायला अडचणी होतात. केंद्र सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेईल, असे ते म्हणाले.
पण आता केंद्र सरकार खरच ही बाब गांभीर्याने घेईल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.






















