Homeटेक्नॉलॉजीAmrut MahaGovt : 'अमृत दुर्गोत्सव 2025'ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! मानवी हातांनी...

Amrut MahaGovt : ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद! मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठ्या डिजिटल फोटो अल्बमचा विश्वविक्रम

Times of Maharashtra Desk, Pune : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या ऐतिहासिक उपक्रमाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणाऱ्या या उपक्रमाने मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम शिवछत्रपतींशी संबंधित लोकसहभागातून गड-दुर्गाचा सन्मान करणारा पहिलाच विश्वविक्रम ठरला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या जगप्रसिद्ध संस्थेने अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना या विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.

शिवप्रेरणा आणि उत्स्फूर्त लोकसहभाग

‘अमृत दुर्गोत्सव 2025’ हा उपक्रम शिवप्रेरणेने भारलेला होता. या उपक्रमात अबालवृद्धांचा मोठा सहभाग दिसून आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून,शेजारील राज्ये, तसेच अमेरिका, इंग्लंड, आखाती देशांमधून नागरिकांनी या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. नागरिकांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या गड-दुर्गांच्या प्रतिकृतींचे फोटो डिजिटल अल्बममध्ये संग्रहित केले. असे अमृतच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुढील उपक्रमांसाठी प्रेरणा

हा विश्वविक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर जगभरातील शिवप्रेमींसाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे. अमृत संस्थेने मानवी कल्पकता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा समन्वय साधून हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हा विक्रम शिवप्रेमींच्या एकजुटीचे प्रतीक आहे. या विक्रमामुळे भविष्यात शिवचरित्राशी संबंधित असे अनेक लोकसहभागाचे उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा मिळेल असे मत अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!