Homeमहाराष्ट्रभारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणागी

भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणागी

गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. समाजातील अस्पृश्यता, अन्याय आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. या दिवशी अनेक शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे देखील आयोजन केले जाते. तुमच्या मुलांनाही या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना छोट्या स्वरुपात पण मोठा आशय असणारा निबंध लिहिण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.

भारताच्या इतिहासात अनेक महान व्यक्ती झाल्या, पण त्यामध्ये डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, मेहनतीने आणि धैर्याने समाजात मोठा बदल घडवून आणला. 14 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस असून, तो आपण “आंबेडकर जयंती” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. बाबासाहेबांनी शिक्षण, समानता आणि न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शाळेसह अनेक सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमामध्ये लहान मुलांसह मोठेही अति उत्सुकतेने सहभाग घेतात
या दिवशी अनेक शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे देखील आयोजन केले जाते. तुमच्या मुलांनाही या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना छोट्या स्वरुपात पण मोठा आशय असणारा निबंध लिहिण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. लहान मुलांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निबंध कसा लिहावा आणि त्यात काय मुद्दे अॅड करावे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण आणि शिक्षण
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे आपल्या भारत देशातील महान नेते, समाजसुधारक आणि विद्वान होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यामुळे आपण दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा करतो. लहानपणी बाबासाहेबांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ते गरीब कुटुंबात जन्मले होते आणि त्या काळात समाजात मोठ्या प्रमाणात भेदभाव होता. शाळेतही त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले. शिक्षणासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाचा त्यांनी धाडसाने सामना केला. ते खूप अभ्यासू होते त्यामुळे त्यांना वाचनाची देखील प्रचंड आवड होती. वाचाल वाचाल हा संदेश त्यांनी प्रत्येक भारतीयांना दिला होता.

संविधान निर्मिती आणि समाजसुधारणेत योगदान
बाबासाहेबांनी भारतातच नाही तर परदेशातही उच्च शिक्षण घेतले. त्यांनी खूप मोठ्या पदव्या मिळवल्या. ते खूप हुशार आणि मेहनती होते. शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून आणि आपल्या कतृत्वातून दाखवून दिले. डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधान निर्मिती चे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी आपल्या देशासाठी संविधान तयार केले. संविधान म्हणजे देश चालवण्यासाठीचे नियम. या नियमांमुळे सर्वांना समान हक्क मिळाले. त्यांनी समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश दिला.त्याचबराबरो महिलांच्या हक्कासाठी देखील आवाज उठवला.

बाबासाहेबांनी समाजातील अन्याय आणि भेदभाव दूर करण्यासाठी खूप मोठे काम केले. त्यांनी लोकांना शिक्षण घेण्यास आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यास प्रेरणा दिली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा प्रसिद्ध संदेश आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतो. ते म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी युवकांसह महिलांनाही शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे आपण आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवू शकतो असा त्यांचा ठाम विश्वास होता.

बाबासाहेबांचे विचार आणि आजच्या पिढीसाठी संदेश

डॉ. आंबेडकर हे एक महान लेखक आणि विचारवंत देखील होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि समाजाला योग्य दिशा दाखवली. त्यांच्या कार्यामुळे आज आपण समानतेने जगू शकतो. बाबासाहेबांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी अनेक मोठे सत्याग्रह आणि चळवळी देखील केल्या. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातून आपल्याला एकतेचा खूप मोठा संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की समाजात कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. जात, धर्म, भाषा किंवा वर्ग यावरून भांडण न करता आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आलो, तर देश अधिक मजबूत होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवते. ते कधीही अडचणींना घाबरून मागे हटले नाही. शाळेत प्रवेश नसतांना देखील शाळेच्या बाहेर बसून त्यांनी आपल्या शिक्षणाची जिद्द आणि आवड कायम ठेवली. आपणही त्यांच्यासारखे प्रामाणिक, मेहनती आणि शिक्षणप्रिय बनले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्याला नेहमीच प्रेरणा देते. त्यांनी दिलेले शिक्षणाचे महत्त्व, समानतेचा संदेश आणि न्यायासाठी लढण्याची शिकवण आपण आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे. एक चांगला नागरिक होऊन, प्रामाणिकपणे वागून आणि इतरांना मदत करून बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श ठेवला पाहिजे. म्हणूनच संपूर्ण जनसमुदाय 14 एप्रिल रोजी अशा या महान व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक अभिवादन करून त्यांच्या कार्याला वंदन करतो

दामोदर प्ररयगाबाई बापुराव गायकवाड
बुद्धिस्ट मायनॉरिटी मशीन प्रभारी मुंबई प्रदेश

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!