Homeआरोग्यअर्जुनी तुकुममध्ये भर दुपारी पाणीपुरवठ्याने संताप; हजारो लिटर पाणी वाया, ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह

अर्जुनी तुकुममध्ये भर दुपारी पाणीपुरवठ्याने संताप; हजारो लिटर पाणी वाया, ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह

आशिष कोटकर ( वरोरा भद्रावती प्रतिनिधी ) :  तालुक्यातील अर्जुनी तुकुम येथील ग्रामपंचायतीचा गलथान कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गावातील बहुतांश नागरिक हे शेतकरी व शेतमजूर असल्यामुळे पिण्याचे पाणी सकाळी लवकर किंवा सायंकाळनंतर सोडणे गरजेचे असताना, ग्रामपंचायतीकडून भर दुपारी पाणीपुरवठा केला जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गावात एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हा पुरवठा नागरिकांच्या उपयोगाचा ठरत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः महिलावर्ग दुपारच्या वेळी शेतात कामासाठी गेलेला असल्याने त्या वेळेत सोडलेले पाणी वाया जात असून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई असताना देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

याशिवाय पाण्याच्या टाकीजवळील वाल्वमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याची बाब समोर आली आहे. या गळतीमुळे केवळ पाण्याचा अपव्ययच होत नाही, तर ग्रामपंचायतीवर आर्थिक भारही वाढत असल्याची चर्चा आहे. उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

मंगळवारी भर दुपारी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुन्हा एकदा हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नागरिकांची मागणी आहे की, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक व्यवस्थित ठरवून सकाळी किंवा सायंकाळीच पाणी सोडावे, तसेच गळती तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा, येत्या काळात आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

error: Content is protected !!