Homeआरोग्यजामनेर तालुक्यात अतिवृष्टीची मदत रखडली; पाच महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत, आंदोलनाचा इशारा

जामनेर तालुक्यात अतिवृष्टीची मदत रखडली; पाच महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत, आंदोलनाचा इशारा

 विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) :  जिल्ह्यातील जामनेर तालुका अंतर्गत बेटावद बुद्रुक परिसरातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. 30 ऑक्टोबरच्या रात्रीपासून 1 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, तूर, उडीद, मूग यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः मका पिके पूर्णपणे वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

या नुकसानीनंतर महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. विविध राजकीय नेते व शेतकरी प्रतिनिधींनीही बाधित भागाची पाहणी करत तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रशासनाला त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांची बँक माहितीही अद्ययावत करण्यात आली.

मात्र, पंचनामे पूर्ण होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच पीक नुकसानीची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी दाखवण्यात आल्याने विमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

दरम्यान, बेटावद बुद्रुक येथे शेतकरी संघटनेतर्फे सुभाष ठोंबरे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. उपोषणावेळी प्रशासनाने लवकरात लवकर मदत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही.

उत्पादन घटले असून बाजारभावही घसरले आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. शासनाने तात्काळ मदत वितरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

error: Content is protected !!