Homeक्राईमब्रह्मपुरीत अवैध दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई; २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रह्मपुरीत अवैध दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई; २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रुपेश देशमुख ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : शहरातील एका घरावर पोलिसांनी धाड टाकून अवैध देशी व विदेशी दारूसाठा जप्त करत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका अल्पवयीनासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी मात्र फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी प्रफुल घरडे यांच्या घरात अवैध दारूसाठा ठेवून त्याची वाहतूक करण्याची तयारी सुरू होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तत्काळ धाड टाकली. तपासादरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली.

या कारवाईत ५६,९६० रुपयांचा दारूसाठा, ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन तसेच १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दारू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन दुचाकी असा एकूण २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शेषराव गेडाम, रोहित गौतम आणि एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रफुल घरडे हा आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज खडसे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली. पथकातील मुकेश गजबे, वशिष्ट रंगारी, प्रवीण भिवगडे, नीलेश तुमसरे, इर्शाद खान आणि स्वप्निल पळसपगार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!