विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : गुढीपाडवा ते रामनवमी या पवित्र पर्वानिमित्त जळगाव येथील बळीराम पेठ परिसरात श्री साई सेवा मंडळाच्या वतीने श्री शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. हा धार्मिक कार्यक्रम दि. १९ मार्च ते २६ मार्च २०२६ दरम्यान श्री साईबाबा मंदिर, बळीराम पेठ, वीर सावरकर पथ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कथेमध्ये ह.भ.प. श्री देवदत्त महाराज (जळगाव) हे कथाकार म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शिवमहापुराणामध्ये भगवान महादेवांच्या विविध रूपांचे वर्णन, शिवमहापुराणाचे मानवी जीवनातील महत्त्व तसेच शिवपुराणाचा सार यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच २६ मार्च रोजी रामनवमी निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्वर्वेद फाउंडेशनच्या वतीने श्रीराम प्रभूंना समर्पित भक्तिगीते, गदिमा लिखित गीते तसेच
रामायणातील निवडक प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इंजि. श्री. भागवत पाटील, सौ. अंजली धुमाळ, श्री. निलकंठ कासार (गायक), श्री. सुशिल महाजन (हार्मोनियम), श्री. प्रवीण महाजन (तबला वादक) आणि श्री. तेजस महाजन (तालवादक) हे कलाकार सहभागी होणार आहेत. दररोज सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






















