Homeताज्या बातम्याबजाज पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026: चौथा टप्पा पिंपरी-चिंचवडमधून, शाळा बंद, वाहतूकीत ...

बजाज पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026: चौथा टप्पा पिंपरी-चिंचवडमधून, शाळा बंद, वाहतूकीत बदल

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बजाज पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026 या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या स्पर्धेत 40 देशांतील 171 नामांकित आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी झाले असून स्पर्धेचा चौथा टप्पा पिंपरी-चिंचवड परिसरातून जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर, स्पर्धा मार्गावर येणाऱ्या सर्व सरकारी व खासगी शाळा 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारी 12 नंतर शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याला बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा पुणे शहर हद्दीतून मार्गक्रमण करत राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत प्रवेश करणार आहे. पुढे ही शर्यत सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी व काळेवाडी परिसरातून फिरून पुन्हा राजीव गांधी ब्रिजमार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे.

स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!