Homeताज्या बातम्याBihar Election Results:बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५: एनडीएची विजयाच्या दिशेने कूच

Bihar Election Results:बिहार विधानसभा निवडणूक निकाल २०२५: एनडीएची विजयाच्या दिशेने कूच

Times of Maharashtra Desk: बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बहुतांश सर्वेक्षणांनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली होती आणि मतमोजणीच्या कलांनी हा अंदाज खरा ठरत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीमध्ये जनता दल-संयुक्त JDU, भारतीय जनता पक्ष BJP आणि इतर लहान पक्ष यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत एनडीएच्या विजयामागे अनेक प्रमुख घटक कारणीभूत ठरत आहेत. नितीश कुमार यांच्या सुशासन फॅक्टरला महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दारूबंदी, पंचायतींमध्ये ५०% आरक्षण, महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि रस्ते,वीज,पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांच्या योजनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तगडा प्रचार डबल इंजिन सरकारची संकल्पना आणि केंद्राच्या विविध योजनांचा फायदा एनडीएला होत आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या RJD जंगलराजच्या कथित भीतीमुळे मतदारांनी स्थिरतेसाठी एनडीएला पसंती दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दुसरीकडे महाआघाडीचे नेतृत्व करणारे तेजस्वी यादव यांचे १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन आणि राहुल गांधी यांचा प्रचार मतदारांमध्ये अपेक्षित परिणाम साधू शकला नाही. भाजपच्या मैथिली ठाकूर यांनी अलीनगर मतदारसंघातून मोठी आघाडी घेत विजय निश्चित केल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आरजेडीच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एकंदरीतच या निकालांनी महाराष्ट्राच्या निवडणूक पॅटर्नप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरवला नाही उलट एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत बिहारमध्ये आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवत बिहारच्या जनतेने एनडीएला विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा संधी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!