Homeताज्या बातम्याकेडीएमसीत भाजप-शिवसेना महायुतीचा दबदबा; 12 उमेदवार बिनविरोध, भाजपची विजयाची हॅट्रिक

केडीएमसीत भाजप-शिवसेना महायुतीचा दबदबा; 12 उमेदवार बिनविरोध, भाजपची विजयाची हॅट्रिक

Times Of Maharashtra Desk : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) जोरदार सुरुवात करत राजकीय आघाडी घेतली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

सुरुवातीला दोन प्रभागांत भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजपने केडीएमसीत विजयाची हॅट्रिक साधली होती.

गुरुवारपर्यंत भाजपच्या 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी दोन प्रभागांत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

प्रभाग 26 अ मधून मुकुंद पेडणेकर, तर प्रभाग 28 मधून महेश पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग 28 मधून मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 19 (क) मधून भाजप-महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा असून बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी महायुतीचे 12 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने बहुमतासाठी आता केवळ 50 जागांची गरज उरली आहे. त्यामुळे महायुतीने निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

वॉर्ड 18 – रेखा चौधरी

वॉर्ड 26 क – आसावरी नवरे

वॉर्ड 26 ब – रंजना पेणकर

प्रभाग 24 ब – ज्योती पाटील

प्रभाग 27 अ – मंदा पाटील

प्रभाग 26 अ – मुकुंद पेडणेकर

प्रभाग 28 – महेश पाटील

प्रभाग क्र. 19 (क) – साई शिवाजी शेलार

ठाण्यात ठाकरे गटाला धक्का

दरम्यान, ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून जयश्री फाटक या शिंदे गटाच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्या माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी असून, ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने ही बिनविरोध निवड शक्य झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!