पुणे :- कोंढवा येथील खडी मशीन चौकी समोर कात्रज कोंढवा बायपास येथे सिमेंटचे पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने त्याच्यापुढे जात असणाऱ्या एकूण ७ ते ८ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक धनकवडी येथील दुचाकी वर असलेला व्यक्ती मयत झाला आहे. यात सुदैवाने विद्यार्थी वाहतूक करणारी बस थोडक्यात बचावली आहे.
अपघात ग्रस्त वाहनांची माहिती पुढील प्रमाणे…
MH12 MK 9387 शाईन
MH12 TV 4208 टेम्पो
MH12 MV 6018 टेम्पो
MH12 NE 6501 महिंद्रा कार
MH12 UK 1449 रॉयल इंफिल्ड
MH 12 DC 3278 फॅशन
MH 12 ET 9752 कार
MH 12 JW 8064 फॅशन प्रो
अपघात ग्रस्त वाहनावरील चालकाचे नाव तेजस रामभाऊ काकडे, वय 22 वर्षे, रा मु पो साबळा तालुका केज जिल्हा बीड असे आहे.
कोंढवा पोलिसांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.



















