Homeताज्या बातम्यापुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आमदारच सुरक्षित नसल्याचे उघड ; आमदार...

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आमदारच सुरक्षित नसल्याचे उघड ; आमदार रोहित पवार यांच्या हडपसर कार्यालयातच जाळपोळ ? हडपसर पोलिसांचा हलगर्जीपणा…

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आमदारच सुरक्षित नसल्याचे उघड ; आमदार रोहित पवार यांच्या हडपसर कार्यालयातच जाळपोळ ? हडपसर पोलिसांचा हलगर्जीपणे…
पुणे :- पुण्यातील पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणारे परिमंडळ ५ मध्ये असलेले हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हलगर्जीपणा करत असल्याचे सरळ सरळ उघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे असलेले जनसंपर्क कार्यालयात तोडफोड आणि जाळपोळ करून तसेच ऑईलपेंट टाकून आवारातील स्पोर्ट्स सायकल जाळणारे आरोपी मोक्काटच असून, हडपसर पोलिसांना या अज्ञातांचा शोध लागलेलाच नाही.

पोलिसांचा हलगर्जीपणाच याला नडला असून, तोडफोड व जाळपोळ झालीच नसल्याचा दावा प्रथम हडपसर पोलिसांकडून करण्यात आला होता. परंतु, जोर वाढल्यानंतर गुन्हे शाखेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर गांभीर्य दाखवत त्या अज्ञातांचा शोध सुरू केला आहे. परंतु, अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. पाच दिवसांपुर्वी १६ तारखेला (रविवारी) पहाटे हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी सुनील महादेव पाटील (वय २९, रा. पुरंदर कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांचे हडपसर येथील भोसले गार्डनजवळील चिनार हॉटेल सृजन हाऊस येथे जनसंपर्क कार्यालय आहे. येथे सुनील पाटील हे देखरेखीसाठी असतात. दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन व्यक्तींनी ही तोडफोड व ऑईलपेंट टाकून सायकल जाळली. दोघांनी भिंतीवरून इमारतीच्या भागात प्रवेश करून हा प्रकार केला. तक्रारदारांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.
हडपसर पोलिसांनी येथे धाव घेतली. पण, प्रकरण उगाच हलक्यात घेतलं अन् सुरक्षा रक्षकाचाच वाद असेल, केवळ सायकल जाळली म्हणत ते गांभीर्याने घेतले नाही. तोपर्यंत कारमधून आलेले अज्ञात व्यक्ती फरार झाले. पण, माध्यमांनी स्वत: जाऊन पाहणी करत जाळपोळ, तोडफोड व ऑईलपेंट टाकल्याचे समोर आणल्यानंतर पोलिसांना घटनेचे गांभीर्य उमगले आणि वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शाखेने या घटनेत लक्ष घातले.
गुन्हे शाखेकडून आता या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला आहे. आरोपींचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. पण, त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. पाच दिवसानंतरही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले आहे.
मागे काही पत्रकारांनी आणि नागरिकांनी देखील परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांना हडपसर पोलीस ठाण्याबाबत लक्ष देण्याबाबत कळविले होते, परंतु त्यांनी त्यावर लक्ष दिले नसल्याचे समजले होते.
यात आता नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे की, जर आमदारांचे घरे आणि कार्यालय सुरक्षित नसतील तर, सामान्यांच्या घराचं कसं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त यामध्ये काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!