Homeमहाराष्ट्रBMC Election 2026 : मुंबई महापालिका रणसंग्रामाआधी महायुतीत जागावाटपावर शिक्कामोर्तब? भाजप-शिंदे सेनेचा...

BMC Election 2026 : मुंबई महापालिका रणसंग्रामाआधी महायुतीत जागावाटपावर शिक्कामोर्तब? भाजप-शिंदे सेनेचा नवा फॉर्म्युला

Times of Maharashtra Desk मुंबई :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता निर्णायक वळण मिळाले आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी भाजप 140 तर शिंदे गटाची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेना मिळून सर्व 227 जागा लढवणार आहेत.

यापूर्वी झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपकडून शिंदे गटासाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे–राज ठाकरे) संभाव्य युतीनंतर भाजपने आपली भूमिका बदलत शिवसेनेला अधिक जागा देण्याची तयारी दर्शवली. तरीही या जागावाटपाच्या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरण

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अंतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरण अवलंबले जात असल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि पनवेल या महापालिकांमधील जागावाटपाचा पेच अद्याप कायम असून, उद्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईसह राज्यातील महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीहोईल. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला असून तेव्हापासून प्रशासक राजवट सुरू आहे. मागील महापालिका निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या वेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या महापौर म्हणून कार्यरत होत्या.

मुंबई महापालिका निवडणूक 2026 : महत्त्वाच्या तारखा

  1. नामनिर्देशन दाखल: 23 ते 30 डिसेंबर
  2. छाननी: 31 डिसेंबर
  3. नामनिर्देशन मागे घेणे: 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: 3 जानेवारी 2026
  5. मतदान: 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल: 16 जानेवारी 2026

आगामी निवडणुकीत ठाकरे गट, मनसे आणि महायुती यांच्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर भाजप आणि शिंदे गट महानगरपालिकेसाठी कोणती रणनीती वापरणार ही पाहण्याजोग असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!