मुंबई, २४ सप्टेंबर २०२५ – कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडने ₹१,००० दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, मानांकित, सूचिबद्ध आणि विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) सार्वजनिक विक्री जाहीर केली आहे. या विक्रीतून कंपनीला सुरुवातीला ₹२०० कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट असून, ओव्हरसबस्क्रिप्शन झाल्यास ही रक्कम ₹४०० कोटींपर्यंत वाढवता येणार आहे.
रोख्यांची विक्री ३० सप्टेंबरपासून सुरू होऊन १४ ऑक्टोबर २०२५ रोजी संपणार आहे. रोखे डीमट स्वरूपात उपलब्ध असतील आणि “फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह” या तत्वावर वाटप होणार आहे.
व्याजदर व कालावधी:
एनसीडींवर वार्षिक ८.५५% ते ९.७०% पर्यंत कूपन दर असून, १८, ३६, ६० आणि १२० महिन्यांच्या मुदतींसाठी पर्याय उपलब्ध आहेत. मालिका VI मध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक ९.६९% पर्यंत प्रभावी उत्पन्न मिळणार आहे.
पतमानांकन:
इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंग लिमिटेड – IVR AA/पॉझिटिव्ह
अॅक्युइट रेटिंग्ज अँड रिसर्च लिमिटेड – ACUITE AA/स्टेबल
निधीचा वापर:
रोखे विक्रीतून उभारलेल्या रकमेपैकी किमान ७५% कर्जवाटप, विद्यमान कर्जाची परतफेड आणि व्याज भरण्यासाठी वापरण्यात येणार असून उर्वरित रक्कम कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाणार आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा म्हणाले की, “ही सार्वजनिक एनसीडी इश्यू आमच्या वाढत्या व्यवसायासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. आम्ही गेल्या १४ वर्षांत एमएसएमई कर्जे, गृह कर्जे, सुवर्ण कर्जे आणि बांधकाम वित्त क्षेत्रात मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.”
कंपनीबद्दल:
कॅप्री ग्लोबल कॅपिटल ही रिटेल केंद्रित महत्त्वाची एनबीएफसी असून तिचे AUM ₹२,४७,५२८.३१ दशलक्ष आहे. कंपनीकडे ११,५४६ कर्मचारी व १,१३८ शाखांचे जाळे आहे.






















