Homeताज्या बातम्याआमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल ; भाजपने पकडला फराळाचे...

आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल ; भाजपने पकडला फराळाचे वाटप करणारा टेम्पो…

काय म्हणाले यावर धंगेकर ?

पुणे : आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपानंतर, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढत आहेत. रविवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळाच्या पाकिटांची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला, ज्यावर आमदार धंगेकर यांची छायाचित्रे असलेल्या पाकिटांचा समावेश होता. भाजपने आरोप केला आहे की, धंगेकर आणि हिंदमाता प्रतिष्ठानच्या नावाखाली सणाच्या फराळाचे वाटप करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात धंगेकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 171H, BNS कायदा 173 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950, 1951 आणि 1989 च्या कलम 123(1)(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचा आरोप :
पुणे भाजपचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले की, “धंगेकर हे निवडणुकीत पराभवाच्या भीतीने आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. दिवाळीच्या भेटवस्तू वाटून ते मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.”

यावर प्रकरणावर काय म्हणाले धंगेकर :
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “गेल्या 30 वर्षांपासून मी सामाजिक जीवनात कार्यरत आहे, आणि माझे कार्यकर्ते वर्षभर लोकांच्या सेवेत असतात. दिवाळीनिमित्त काही जीवनावश्यक वस्तू वाटल्या जात होत्या, मात्र यात माझा किंवा कुटुंबाचा कोणताही सहभाग नव्हता.” तसेच, त्यांनी भाजपवर आरोप करत म्हटले की, “भाजपने हे प्रकरण जाणूनबुजून ताणले आहे, आणि पोलिसांनी त्यांच्या दबावाखाली कारवाई केली. दरम्यान, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होत असले तरी मी थांबणार नाही मी लढत राहीन आणि मी जिंकेन.”

ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत असून, धंगेकर यांच्यावरच्या आरोपांमुळे त्यांची राजकीय प्रतिमा कसोटीवर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!