Homeताज्या बातम्याराज्यातील शालेय शिक्षण विभागातील वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे...

राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार…

राज्यातील शालेय शिक्षण विभागात वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार…

पुणे : राज्य शालेय शिक्षण विभागात सध्या वशिलेबाजी आणि अनियमिततेची मोठी चर्चा रंगली आहे. विविध कार्यालयातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार देताना वशिलेबाजीच्या जोरावर निष्क्रीय आणि चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सक्षम आणि पात्र अधिकारी नाराज असून, शिक्षण व्यवस्थेत अस्वस्थता पसरली आहे.
राज्यातील नऊ प्रमुख कार्यालयांतील शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त असून, या पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये वशिलेबाजीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषत: चौकशीच्या कचाट्यात असलेले डॉ. वंदना वाहुळ (पुणे), ज्योती शिंदे (मुंबई बोर्ड), आणि रजनी रावडे (शिक्षण आयुक्तालय) यांच्यासारखे अधिकारी महत्त्वाच्या पदांवर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
वशिलेबाजीचा शिरकाव :-
सेंट्रल बिल्डिंगमधील एका संचालक कार्यालयात या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवून, फक्त सोयीसाठी वशिलेबाजीच्या जोरावर कार्यभार देण्यात येत आहे. या अनियमिततेमुळे काही अधिकाऱ्यांनी न्यायासाठी मॅटकडे धाव घेण्याची तयारी केली असून, काहींनी पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे मानसिक तणावातून स्वेच्छानिवृत्तीचा विचार सुरू केला आहे.
पदोन्नती नाकारण्याचे वाढते प्रमाण :-
शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती नाकारली असून, शिवलिंग पटवे (अमरावती) यांनीही नागपूर बोर्डाच्या अध्यक्षपदी पदोन्नती स्वीकारलेली नाही. यामुळे शिक्षण विभागात वशिलेबाजीची चळवळ आणि पदोन्नती प्रक्रियेतून होणारी अनियमितता उघड होत आहे.
अधिकार्‍यांचा संताप :-
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या वशिलेबाजीचा फायदा मिळाल्याने, शिक्षण व्यवस्थेत कार्यरत दिग्गज अधिकारी आपापल्या हक्कांसाठी लढण्याची तयारी करत आहेत. या वशिलेबाजीमुळे शिक्षण व्यवस्थेचा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, विभागातील असंतोष उफाळून आला आहे.
शिक्षण विभागाच्या व्यवस्थेमध्ये एक स्फोटक स्थिती निर्माण झाली असून, योग्य ती पावले उचलली नाहीत तर पुढील काळात अनेक अधिकारी न्यायासाठी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!