Homeताज्या बातम्यानयनता विद्यापीठातील वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार..

नयनता विद्यापीठातील वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार..

27पुणे २७ जानेवारी,२०२५ : नयनता विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्य खाजगी विद्यापीठ अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आले असून, या वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील. जागतिक दर्जाची संस्था म्हणून नावारुपाला येण्याची या विद्यपीठाची महत्त्वाकांक्षा आहे. या विद्यापीठाला कृष्ण गोपालकृष्णन, नादिर गोदरेज, नौशाद फोर्ब्स, मेहर पुदुमजी आणि सतीश रेड्डी यांसारख्या नामवंत उद्योगपतींचे पाठबळ लाभले आहे.

पुण्यातील बावधन येथे नयनरम्य 6 एकर परिसरात वसलेले नयनता विद्यापीठ पूर्णतः निवासी स्वरूपाचा पदवी अभ्यासक्रम प्रदान करणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना बदल घडवणारा शैक्षणिक अनुभव देईल, असा विश्वास आहे. उद्घाटन सोहळ्यात कृष्ण गोपालकृष्णन यांनी मूल्याधारित संस्थांचे महत्त्व आणि संस्थात्मक संस्कृती मजबूत करण्यामध्ये संस्थापकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

भारतात उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज तातडीची असल्याचे नौशाद फोर्ब्स म्हणाले. नयनता विद्यापीठाच्या भेदभाव न करता, गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रियेतील कटिबद्धतेबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच, देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक विविधतेचे प्रतिबिंब विद्यापीठात दिसेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

नयनता विद्यापीठाने भारतीय उद्योग महासंघाशी भागीदारी केली आहे. यामुळे सैद्धांतिक शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि सांस्कृतिक साक्षरतेचा समतोल साधणारे वेगळेपण असलेले शिक्षण संरचना तयार करण्यात आली आहे.

डॉ. रंजन बॅनर्जी यांनी नयनता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी ठरवलेल्या मूलभूत तत्त्वांची रूपरेषा मांडली. त्यांनी व्यक्तिगत काळजी आणि करिअर विकास या दोन मुख्य गोष्टींवर भर दिला. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्म-जागरूकता वाढवण्यासाठी वैयक्तिक विकास कार्यक्रम राबवला जाणार आहे. याशिवाय, विद्यापीठात अशा प्रकारची संस्कृती विकसित केली जाईल. या ठिकाणी प्राध्यापक आणि संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांच्या लहान गटांशी, तसेच वैयक्तिक पातळीवर संवाद साधतील. तसेच, प्रत्येक शाखेतील प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पाच महिन्यांची आणि एका सत्र कालावधीची इंटर्नशिप समाविष्ट असेल. याशिवाय, तीन एक महिन्यांच्या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट, सामाजिक आणि सरकारी क्षेत्रांचा अनुभव घेता येईल. त्यानंतर, आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाच महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींना प्राधान्य देण्यासाठी नयनता विद्यापीठ विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. विद्यार्थी 18 महिन्यांच्या बहुविषयक आधारभूत कार्यक्रमानंतर आपल्या आवडीचे विषय निवडू शकतील. पहिल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, आणि पहिल्या बॅचचे वर्ग ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील.

या उद्घाटन सोहळ्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, नागरी समाज संघटना, आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नयनता विद्यापीठाच्या उद्दिष्टे आणि दृष्टीकोनाबद्दल सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!