Homeताज्या बातम्याक्रिकेट वर्ल्डकप पाहण्यासाठी लोकांची गर्दी पुणे; शहरात हॉटेल, मैदान, चौकात लागले स्क्रीन

क्रिकेट वर्ल्डकप पाहण्यासाठी लोकांची गर्दी पुणे; शहरात हॉटेल, मैदान, चौकात लागले स्क्रीन

क्रिकेट वर्ल्डकप पाहण्यासाठी लोकांची गर्दी पुणे; शहरात हॉटेल, मैदान, चौकात लागले स्क्रीन…

पुणे : क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी केली असून, ठिकठिकाणी हाॅटेल, रेस्टॉरंटसह मोठ्या मैदानावर आणि टेरेसवर स्क्रीन लावण्यात आले आहेत. हा सामना सर्वांसोबत पाहत जल्लोष केला जाणार आहे.

त्यासाठी खास तिरंगा, टी-शर्टची खरेदी देखील अनेकांनी केली आहे. भारत जिंकल्यानंतर वेगळाच जल्लोष करण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत.

अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील सर्व ठिकाणी शनिवारी (दि. १८) दिवसभर तयारी केली जात होती. हाॅटेलमध्ये मोठ्या पडद्याची व इतर गोष्टींची तजवीज करण्यात येत होती. तसेच विमाननगर, कोरेगाव पार्क येथील मोठ्या लाॅजवर विशेष सोय केली आहे. तिथे शंभर रुपये आणि त्याहून अधिक रुपयांची तिकिटे लावण्यात आली आहेत. तसेच ऑफलाइन बुकिंग देखील घेण्यात आली आहे.

हा सामना एकट्याने पाहणार की कुटुंबातील सदस्यांसोबत? याची माहिती घेतली जात होती. तशी सोय लाॅजवर करून देण्यात येत होती. सोबतीला खाद्यपदार्थ आणि कोल्ड्रिंक्सची सुविधा देण्यात येणार आहे. एकूणच सर्वत्र शहरभर अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे. 

एकमेकांसोबत आनंदोत्सव

काही गणेश मंडळांनीही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल मॅच एलईडीवर पाहण्याची खास सोय केली आहे. हा सामना एकत्र पाहण्यावर सर्वांचा भर आहे. मस्त शिट्टी, जोरजोरात एकमेकांना टाळ्या देऊन सामन्याचा आनंद घेण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत.

तुळशीबागेत थेट प्रक्षेपण

तुळशीबाग मंडळाच्या वतीने स्क्रीनच्या माध्यमातून अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तुळशीबागेत नेहमीच खरेदीसाठी गर्दी होत असते. त्या नागरिकांना सामना पाहता यावा, खरेदी करता करता सामना पाहण्याचा आनंद मिळावा, म्हणून ही व्यवस्था केली आहे. भारत अंतिम फेरीत खेळत असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना प्रत्येक दहा षटकानंतर एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यांना सवाई मसाला यांच्या वतीने गिफ्ट देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे अनेक गिफ्ट उद्या ठिकठिकाणी मिळणार आहेत.

निळ्या जर्सीसोबत पाहणार सामना

अंगात निळी भारताच्या नावाची जर्सी घालून सामना पाहण्याचा आनंद अविस्मरणीय असतो. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींनी ही जर्सी विकत घेतली आहे. ही घालूनच अनेक कार्यालयांमध्ये, हॉटेलमध्ये, सोसायट्यांमध्ये सामना पाहिला जाणार आहे. तशी तयारी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!