Homeताज्या बातम्याChristmas Celebration Daund : दौंड येथील संस्कार स्कूलमध्ये नाताळ सणानिमित्त सायकल वाटप...

Christmas Celebration Daund : दौंड येथील संस्कार स्कूलमध्ये नाताळ सणानिमित्त सायकल वाटप…

दौंड (प्रतिनिधी राहुल आढाव,मयुर साळवे) : बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी संस्कार प्रायमरी व हायस्कूल येथे नाताळ सणानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुंदर नृत्य सादरीकरणाने झाली. इयत्ता ३री व ४थीच्या विद्यार्थिनींनी एक नृत्य तर इयत्ता ५वी, ६वी व ७वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या दोन नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच काही विद्यार्थ्यांनी प्रभू येशूंचे गुणगान करणारी भावस्पर्शी गीते सादर केली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाताळ सणाचे औचित्य साधून संस्कार स्कूलमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेच्या दहा वर्षांच्या परंपरेनुसार मान्यवरांच्या हस्ते हे सायकल वितरण करण्यात आले. यावेळी इयत्ता ६वीतील कु. शौर्य पवार व इयत्ता ५वीतील कु. आरोही जाधव या दोन विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन खवाड (चेअरमन, नॉर्थन मेमोरियल ख्रिस्त चर्च), बाळासाहेब क्षेत्रे (पास्टर),आशिष क्षेत्रे, विजय बोरकर (नगरसेवक), विशाल माशाळकर, वैशाली माशाळकर (नगरसेविका), दीपक शासम (अध्यक्ष, शासम फाउंडेशन) यांची उपस्थिती लाभली. तसेच गणेश भोसले,शिरीष पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये सामायिकरण व काळजी घेण्याची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत पाॅटलुक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपत विविध राज्यांतील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या विविध पदार्थांचा आनंद घेतला. यावेळी शाळेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९वीतील कु. शर्वरी पवार व कु. अपूर्वा शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता ९वीतील विद्यार्थी कु. अरफात शेख याने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!