Homeताज्या बातम्याडेक्कन शुगर टेक्नॉलॉजी जमीन प्रकरणात खळबळ; विजय कुंभारांचा दावा – व्यवहारात पार्थ...

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी जमीन प्रकरणात खळबळ; विजय कुंभारांचा दावा – व्यवहारात पार्थ पवारांचा सहभाग

Times of Maharashtra Desk: 1936 साली स्थापन झालेल्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन (DSTA) या नामांकित संस्थेच्या जागेच्या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील ज्या इमारतीत पत्रकार परिषद घेतली, त्या इमारतीच्या उभारणीसंदर्भात आज विजय कुंभार यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले.

विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची सुमारे 30 हजार स्क्वेअर फूट जागा असून, त्यातील अर्ध्या जागेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय आहे. या जागेसाठी धर्मादाय आयुक्तांनी फक्त 60 वर्षांच्या भाडेकरारास (लीज) परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात ही जागा विकसित करून विकली गेली, असा आरोप त्यांनी केला आहे.

पॉवर ऑफ अटर्नी आणि संशयास्पद दुवे
संस्थेची जागा विकसित करण्यासाठी साहिल प्रधान या व्यक्तीस पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली होती. हाच साहिल प्रधान मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यातील व्यवहाराचा साक्षीदार असल्याचे दस्तऐवजांमध्ये नमूद असल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला.याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा या प्रकरणाशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच ही जागा विकसित करणारी कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनी असून, या कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार या काही इतर कंपन्यांमध्ये एकत्र संचालक असल्याचा दावाही कुंभार यांनी केला.

लीजची परवानगी, पण विक्रीचा आरोप
विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेने आर्थिक अडचणीचे कारण देत कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीला 15 हजार स्क्वेअर मीटर जागा 60 वर्षांच्या भाडेकराराने दिल्याचे धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या जागेवर 13 मजली इमारत उभारून सुमारे 63 हजार स्क्वेअर फूट कमर्शियल क्षेत्र तयार करण्यात आले आणि ती जागा व्यावसायिक दराने विकली गेली, असा आरोप त्यांनी केला.या इमारतीसाठी चार एफएसआय (FSI) वापरण्यात आल्याचे सांगत, खालच्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असून, उर्वरित मजले विकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपवरही अप्रत्यक्ष आरोप
2017 पासून या जागेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू होते, असे सांगत विजय कुंभार यांनी या प्रकरणात भाजपही सहभागी असल्याचा आरोप केला. “सर्व माहिती असूनही कोणतीही कारवाई होत नाही, कारण सत्तेत एकत्र आहेत,” असा दावा त्यांनी केला.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा ऐतिहासिक वारसा
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची स्थापना 1936 साली उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांनी पुण्यात केली. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात संस्थेच्या शाखा असून साखर उद्योगातील तांत्रिक आणि शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेत 2200 हून अधिक सदस्य असून, चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, 35 डॉक्टरेटधारक आणि 1400 पेक्षा अधिक पदवीधर या संस्थेतून घडले आहेत.संस्थेला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसून, सदस्यांचे योगदान, जाहिराती आणि इतर माध्यमांतून संस्थेचा खर्च चालतो.

चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर अद्याप संबंधित संस्था, कल्पवृक्ष कंपनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!