Homeताज्या बातम्यापुणे महापालिका निवडणूक 2026: प्रभाग क्रमांक 24 मध्ये तिरंगी लढत, धंगेकर–बीडकर संघर्षाला...

पुणे महापालिका निवडणूक 2026: प्रभाग क्रमांक 24 मध्ये तिरंगी लढत, धंगेकर–बीडकर संघर्षाला नवे वळण

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मध्ये पुन्हा एकदा राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे गणेश बीडकर यांचा पराभव केला होता. यंदा मात्र ही लढत वेगळ्या स्वरूपात रंगणार असून, रवींद्र धंगेकरांचे पुत्र प्रणव धंगेकर मैदानात उतरले आहेत.

भाजपकडून गणेश बीडकर, शिवसेनेकडून प्रणव धंगेकर आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नवथरे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असल्याने या प्रभागात यावेळी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन शिवसेनेच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.या प्रभागात भाजप–शिवसेना युती तुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गणेश बीडकर यांची उमेदवारी भाजपकडून आधीच निश्चित होती. तर प्रणव धंगेकर यांनाही याच प्रभागातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र युतीत तोडगा न निघाल्याने भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागात मजबूत उमेदवार देण्याची रणनीती आखली होती. ग्राऊंड लेव्हलवरील कामगिरी आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन गणेश नवथरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय आणि K.E.M. हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागात नवथरे यांचे सामाजिक कार्य आणि ओळख भक्कम असल्याचे सांगितले जाते.विशेष म्हणजे, गणेश नवथरे हे रवींद्र धंगेकर यांचे पूर्वीचे निकटवर्तीय मानले जातात. धंगेकर यांनी लढवलेल्या मागील निवडणुकांमध्ये नवथरे सक्रियपणे सहभागी होते आणि संघटनात्मक काम पाहत होते. त्यामुळे आता भाजपपेक्षा नवथरे यांच्या उमेदवारीमुळेच प्रणव धंगेकर यांना अधिक आव्हान निर्माण होऊ शकते, अशी चर्चा आहे. तिन्ही उमेदवारांची ताकद, स्थानिक समीकरणे आणि मतांचे विभाजन यामुळे प्रभाग क्रमांक 24 मधील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!